December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : मराठी संस्कृती अभिजात आहे : प्रा. भारती

“एक कविता कुसुमाग्रजांची एक कविता तुमची” कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण

मराठी भाषा जगवायची असेल तर रोजगाराशी तिचा संबंध जोडला गेला पाहिजे. मराठी भाषा दुबळी, लाचार नाही हे जेव्हा मराठी माणसाला कळेल तो दिवस अभिमानाचा असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठी राजव्यवहारकोश आणि स्वा. सावरकर या दोघांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीचे प्रयत्न आपण विसरता कामा नये. मराठी संस्कृती अभिजात आहे असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक कविता कुसुमाग्रजांची, एक कविता तुमची’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे साहित्यिक चंद्रशेखर भारती यांनी व्यक्त केले.

मनातल्या भावना पोहचविण्यासाठी कविता हे एक उत्तम माध्यम आहे. मी कुसुमाग्रजांचे साहित्य वाचत मोठा झालो त्यांचे नटसम्राट हे नाटक तर आयुष्याचा नवा आयाम देणारे आहे असे प्रमुख पाहुणे रंगकर्मी सुधीर चिने यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात ४० कवींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमिता कुकडे व परिघा विधाते यांनी केले. यावेळी, वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्या सीमा गोखले, निलिमा नरेगलकर, अरविंद शिंपी तसेच ग्रंथसेविका उपस्थित होते.