December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

दोघा घरफोडी करणाऱ्यांना कळवा पोलिसांनी अटक केले

दोघा घरफोडी करणाऱ्यांना कळवा पोलिसांनी अटक केले

ठाणे : घरफोडी करणारे दोघे अटकेत; १२ तोळ्यांचे दागिने हस्तगत

कळवा पोलिसांनी शिताफीने गुन्हा आणला उघडकीस

ठाणे

कळवा येथे भरदिवसा घरफोडी करून कोणताही पुरावा मागे न ठेवणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वालीव येथील शेखर नटराज नायर (३७) आणि देवेंद्र गणेश शेट्टी (२६) या दोघा घरफोडी करणाऱ्यांना कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले. त्यांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी ६ लाखांचे १२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी दिली.

मनिषानगर येथे राहणाऱ्या स्मिता मालवणकर यांनी दिलेल्या तक्रारीत ०७ जानेवारीच्या भरदिवसा त्यांच्या घरातुन कोणीतरी अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी घरफोडी करत घरातील ६ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदेश आजगावकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक के. एस. बघडाणे यांच्या पथकाने कोणताही पुरावा उपलब्ध नसताना घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शेखर आणि देवेंद्र यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान घरफोडीत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडुन गुन्हयात चोरलेल्या मालापैकी ६ लाखांचे सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. बघडाणे हे करीत आहेत.