April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

एसटी आगाराला रिक्षाचालकांचा विळखा

कल्याण : एसटी आगाराला कोणी घातलाय विळखा ..?

कल्याण

कल्याणच्या एसटी आगाराला रिक्षाचालकांचा विळखा पडला असून एसटी बस स्टॅण्ड व बस स्टॅण्डसमोरील मुख्य रस्त्यावर अपप्रवृत्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी कब्जा केला आहे. या अपप्रवृत्ती रिक्षा चालकांच्या उपद्रवी हरकतींनी प्रवासी हैराण झाले आहेत. याकडे स्थानिक पोलीस, वाहतुक पोलीस आणि आरटीओ प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाश्यांकडून केला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसल्याने एसटी बस सेवा अत्यंत संथगतीने सुरु आहे. एसटी बस सेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने केडीएमटी व एनएमएमटी परिवहन उपक्रमाच्या बस प्रवाश्यांच्या सोयीसाठी कल्याण बस आगारातुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी झाली आहे. पंरतु एसटी बस बंद असल्याचा फायदा घेऊन विना लायसन्स बॅच, विना परवाना रिक्षा व रिक्षा चालंकानी एसटी बस स्थानकावर व समोरील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर कब्जा केलेला आहे.

या रिक्षा चालकांकडुन केडीएमटी, एनएमएमटी बस संचलनास अडथळा निर्माण केला जात आहे. महापालिका परिवहन बस सेवा उपक्रमातील चालक, वाहक कर्मचारी यांना शिविगाळ, दमदाटी करण्याची मजल देखील या अपप्रवृत्ती रिक्षा चालकांची पोहोचली आहे. त्यामुळे अशा या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य प्रवासी करीत आहेत.