कल्याण
भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आर्मी युनिटमध्ये कार्यरत असणाऱ्या एकास अटक करण्यात आली असून त्याचा तीन वर्षापासून पोलीस शोध घेत होते.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी ही परदेशी महिला गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. रात्री साडे अकराच्या सुमारास कल्याण-कसारा दरम्यान साहिश टी याने त्या महिलेसोबत अश्लील वर्तन केलं. त्यानंतर या महिलेने हा सर्व प्रकार भारतीय दूतावासाला सांगून तक्रार नोंदवली होती. अनेक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ही तक्रार कल्याण जीआरपीने दाखल करून घेतली. विनयभंग करणाऱ्याची कोणतीही माहिती नसल्याने महिलेला फोन लावून त्या व्यक्तीचे वर्णन विचारले. त्यानंतर समाज माध्यमाचा आधार घेत पोलिसांनी साहीशचा शोध घेतला. मात्र, साहीशला पोलिसांच्या हालचालीची माहिती मिळताच त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला. परंतु, न्यायालयाने तो फेटाळल्याने साहीशने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयातदेखील साहिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला. याच दरम्यान साहिश कल्याणमध्ये नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने त्याला अटक केली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर