April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : आरटीई प्रवेशासाठी केडीएमसी शिक्षण विभागाचे मदत केंद्र सुरु

वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५% जागांवर मोफत ऑनलाईन प्रवेश

कल्याण

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५% जागांवर मोफत ऑनलाईन प्रवेश असून शाळांमध्ये शाळांनी निश्चित केलेल्या प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी २५% प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

इच्छुक अर्जदारांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या www student maharashtra.gov.in/adm portal/Users/teindex  या वेबसाईटवर दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत बालकांचे अर्ज भरता येतील. प्रवेशा संबंधित पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभागामार्फत मदत केंद्र सुरु करण्यात आलेली असून केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.