Power by The Web Cloud Media

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्ग रोखला चिखलाने

मुंबई-नाशिक महामार्ग रस्त्यावर पडलेल्या चिखलाने रोखला

ठाणे

रस्त्यावर पडलेल्या चिखलाने मुंबई-नाशिक महामार्ग हा पुन्हा एकदा बुधवारी रोखून धरला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास समोर आली. रस्त्यावर पडलेल्या चिखलावर पाण्याचा मारा करून चिखल रस्त्याच्या एका बाजूला केला. त्यानंतर, जवळपास अर्धा तासानंतर वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसातील या महामार्गावरील ही दुसरी घटना आहे.

मुंबईकडून नाशिककडे एका ट्रकमधून चिखल नेला जात असताना, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या ट्रकमधील चिखल माजिवाडा ब्रीजजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर पडल्याची माहिती समजताच कापूरबावडी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतुक थांबवून रस्त्यावर पडलेल्या चिखलावर अग्निशमन दलाच्या फायर वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा स्प्रे मारून चिखल रोडच्या बाजूला करण्यात आला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मुंबई-नाशिक महामार्ग त्यानंतर सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *