April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी केडीएमसीवर मोर्चा

नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी केडीएमसीवर मोर्चा

कल्याण : तर त्या प्रभागात निवडणुका घेण्यात येऊ नये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक

कल्याण

जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक झाला असून नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी या पक्षाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगीता वशिष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या उपस्थितीत पश्चिमेतील गुरुदेव हॉटेल येथून या मोर्चाला सुरवात करत महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनस्पर्शाचा इतिहास असलेला जुना ऐतिहासिक भटाळे तलाव पालिकेच्या अधिकारी व भूमाफिया यांच्या संगनमताने तलाव विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापलिकेच्या अधिकारी व भूमाफिया यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्या यावे.

गणेशवाडी व इंदिरानगर, टिटवाळा या विभागाची पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, गटारे व रस्ते पायवाटा आदी सुविधा पुरविण्या याव्यात.

केडीएमसी हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे निष्कासित करावी. नविन घरांना टॅक्स लावला जातो. परंतु, केडीएमसी जुन्या घरांचे हस्तांतरण करु देत नाही ते अजुनही नोटरीवर चालते. पालिकेतर्फे या घरांचे नोंदणीकरण करण्याचे सांगण्यात येते. झोपडपट्ट्या अनधिकृत असतील तर त्या प्रभाग क्षेत्रात निवडणुका घेण्यात येऊ नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले.