कल्याण
बालक मंदिर संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमरी विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूचे उद्घाटन बच्चे कंपनीच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये शाळादेखील सुरु झाल्या आहेत. शाळेत येणाऱ्या या विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना प्रसन्न वाटावे यासाठी शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शाळेच्या इमारतीत आता सहा वर्ग खोल्या असून प्रत्येक वर्ग उत्तमरित्या सजविण्यात आला आहे. मुलांच्या भावविश्वाचा विचार करून या वर्गांमध्ये सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत चित्रकारांनी मुलांना आकर्षित करणारी चित्रे प्रत्येक भिंतीवर काढली आहेत.
शाळेत ठिकठिकाणी लावलेल्या कटआऊट स्वरूपातील चित्रांनी संपूर्ण सजावटीत विशेष रंग भरले आहेत. इमारतीच्या तिन्ही मजल्यांना अशाप्रकारे नवा साज चढवण्यात आला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या सर्व सजावटीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर, सर्व पालकांनीदेखील या नूतन वास्तूबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू