December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : भाऊराव पोटे विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

कल्याण

पश्चिमेतील कै. भाऊराव पोटे विद्यालयाच्या पटांगणात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका मीनल पोटे, माजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कल्याणच्या आतरडे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी शिक्षणाविषयीचे बारकावे व मुलांच्या सवयी आई-वडिलांचे संस्कार, आपण कसे घडलो याची माहिती दिली. माजी नगरसेविका छाया वाघमारे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.

स्वाती जवरे यांनी प्रत्येक ठिकाणी डान्स कसा महत्त्वाचा आहे त्याचे स्पष्टीकरण देत आपली तब्येत कमी करायचे असेल, तर झुम्बा डान्स किती महत्त्वाचा आहे याविषयी माहिती दिली. जया वाघमारे यांनी पर्यावरण अत्यंत महत्त्वाचे काम आहे. आपल्या सभोवती कितीतरी पद्धतीचे पक्षी आपण पाहत असतो, टिपत असतो पर्यावरणाचा मानवाने कसा ऱ्हास केला आहे. याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. काशीबाई जाधव यांनी थोडक्यात भाषण करून विद्यार्थ्यांची, शिक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे बिपीन पोटे व मीनल पोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सुरेश वामन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे संतोष सातपुते, विकास चौधरी प्राथमिक विभागाचे घुले सर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.