December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

उल्हासनगर : जूनियर राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी महिला खेळाडुंची निवड

उल्हासनगर

एसएसटी महाविद्यालय आणि मुंबई बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धे पूर्वीचे खेळाडू शिबिराचे आयोजन एसएसटी महाविद्यालयात करण्यात आले होते. दोन दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये भारताचे बॉल बॅडमिंटन मार्गदर्शक तसेच रेल्वेचे मार्गदर्शक हनुमंतराव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. संपूर्ण शिबीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

यात मुंबई बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव हरीश सत्पथी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी दिपक खरात, सचिन कालीकल, लीना कांबळे, मंदार परब यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. टीमसोबत प्रथमेश म्हात्रे, दक्षता राउत, सचिन कालिकल, आनंद खंडागळे यांची मार्गदर्शक आणि मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धा दिंडीगुल, तामिळनाडू येथे झाली. या स्पर्धेत मुंबईची कर्णधार आणि एसएसटी महाविद्यालयाची खेळाडू आरती यादवला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, महाविद्यालयाचे मार्गदर्शक दीपक खरात आणि मुंबई विभागाचे सचिव हरीष सत्पथी या सर्वांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.