बार मालकाने आणि व्यवस्थापनाने केली दिलगीरी व्यक्त
कल्याण
जागतिक महिला दिनाच्या संध्येस कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक आशा रसाळ यांना पुर्वेतील एका बारच्या दर्शनी भागावर सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावले असल्याचे समजले. याची दखल घेत रसाळ यांनी आपल्या रणरागिणींसह या बारकडे जाऊन आक्षेप घेत दर्शनी भागातील सावित्रीबाई फुले यांचे चित्र काढण्यास भाग पाडले.
महिला दिनाच्या दिवशी पूर्वेतील विजय नगर येथील फुड किंग डायनिंग ॲण्ड बारच्या प्रथम दर्शनी भागावर सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावून आतमध्ये बार सुरू होता. कल्याण पूर्वेच्या शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक रसाळ यांना हि बाब समजताच त्यांनी कल्याण विधानसभा संघटक राधिका गुप्ते, उपशहर संघटक भारती जाधव, उपशहर सहसंघटक नंदा सावंत, ऋतुकांचन रसाळ यांच्यासहीत बारवर धडक दिली. सावित्रीबाईंचे छायाचित्र लावल्याबद्दल तीव्र आक्षेप घेत शिवसेनेचा हिसका दाखवत बार मालकाला हे छायाचित्र काढायला लावले.
बार मालकाने आणि व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करुन शिवसेना महीला आघाडीची जाहिर माफी मागितली.
हे सुद्धा वाचा…
कल्याण : आडीवली गावात महिला दिन साजरा
कल्याण : म्हणून, उच्च न्यायालयाने केली केडीएमसीची प्रशंसा
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू