नांदीवली टेकडी परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येचे केल निराकारण
कल्याण
नांदीवली टेकडी परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून निराकारण केल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेची प्रशंसा केली आहे.
केडीएमसी क्षेत्रातील २७ गावातील नांदीवली टेकडी या उंचावर असलेल्या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने या भागातील नागरिकांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान या समस्येवर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची सुचना न्यायालयाने दिली होती. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनाबलागन यांच्यात या विषयाबाबत बैठक संपन्न होवून आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे डोंबिवलीतील कार्यकांरी अभियंता किरण वाघमारे यांच्या पथकाने युध्द पातळीवर काम करुन अंदाजे १२०० मी. लांबीची २०० मीमी व्यासाची नवीन वितरण वाहीनी एमआयडीसी टॅपिंग पॉईंट ते पिंपळेश्वर मंदिर संपपर्यंत टाकून व संपमध्ये ६० एचपीचा सबमर्सिबल पंप बसवून पाणी पुरवठा सुरळीत चालू केला.
या कामामुळे नांदिवली टेकडी परिसरातील पाणी टंचाई दूर झालेली असून हे काम केडीएमसीने अवघ्या सात दिवसांत पुर्ण केले. केडीएमसीने तातडीने केलेल्या कामाची दखल उच्च न्यायालयाने घेऊन याबाबत महापालिकेची प्रशंसा केली आहे.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी