कल्याण
स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रात स्मॅश रॅकेट खेळांच्या प्रचारासाठी असोसिएशन नुकतेच तयार करण्यात आले. भारतभर या खेळांच्या प्रचारासाठी राजस्थानचे मा. मोहम्मद इकराम सचिव स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया हे अथक परिश्रम घेत आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रातील अविनाश पाटील, तुषार वारंग, नामदेव येडगे आणि स्वप्नील शिरसाठ यांनी जयपूर येथे आयोजित पंच प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. नुकतेच असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कोंढाळकर यांच्या हस्ते टीशर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी अमित निखार आणि योगेश बदडे उपस्थित होते. ग्रामीण भागांतील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी असोसिएशनच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत असे अध्यक्ष किशोर कोंढाळकर यांनी यावेळी सांगितले.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी