आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली बाब
कल्याण
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत, केडीएमसीच्या पहिल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण कल्याण पूर्वेतील तिसगाव येथे १७ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, या उद्घाटनानंतर हे डायलेसीस केंद्र अद्यापही बंदच असल्याची बाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे.
दहा बेडचे अद्यावत डायलिसिस सेंटर सुरू करून डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांसाठी एक चांगली आरोग्य सेवा होईल असे अठरा लाख कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना वाटले. खूप गाजावाजा करून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून, मोठमोठे फ्लेक्स, बॅनर लावून याची प्रसिद्धी करण्यात आली. पण, डायलिसिस सेंटरचे लोकार्पण होऊन तीन आठवडे उलटून गेले असतानाही हे सेंटर सुरू झालेले नाही. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे डायलिसीस पीडित रुग्णांकडून अनेक तक्रारी आल्यामुळे या बंद असलेल्या सेंटरच्या बाहेर आंदोलन करून कल्याण-डोंबिवलीच्या प्रशासनाचा व खोट्या आरोग्य सेवेचे लोकार्पण करणाऱ्या नेत्यांचा जाहीर निषेध केला असल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले.
येत्या आठ दिवसात जर डायलिसीस सेंटर सुरू झाले नाही तर, बंद असलेल्या डायलिसीस सेंटरच्या समोर आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपोषण करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. डायलिसीस
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू