April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कपड्याच्या चिंध्या असलेल्या गोडाऊनला आग

कपड्याच्या चिंध्या असलेल्या गोडाऊनला आग

ठाणे : ठाण्यात विविध ठिकाणी आगीच्या घटना

ठाण्यात चिंध्यांच्या गोडाऊनला आग

ठाणे : कपड्याच्या चिंध्या असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना रविवारी दोन वाजण्याच्या सुमारास शिळफाटा-महापे रोड परिसरात घडली. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाला दोन ते अडीच तासांचा कालावधी लागल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली. आग लागलेला गोडाऊन लालबीबी यांच्या मालकीचा असून या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टोरंट पॉवर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कपड्याच्या चिंध्या असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केली. संपूर्ण आगीवर साडेचारच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी, २ फायर इंजिन व १ वॉटर टँकर पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती विभागाने दिली.

……………………………………………………………………………….

एसीला आग

ठाणे : राम गणेश गडकरी पथ, येथे पर्ण कुटीर इमारतीच्या तळमजल्यावरील अँबसॅल्युट ग्लॅम ब्युटी शॉपच्या एयर कंडिशनर (एसी) आउटडोअर युनिटला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. ही आग किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

……………………………………………………………………………….

गवताला आणि कचऱ्याला आग

ठाणे : कळवा, विटावा रेल्वे पुलाजवळील गवताला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास किरकोळ आग लागली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, उपवन परिसरात कचऱ्याला किरकोळ आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.