कल्याण
दावडी येथे २५० कोटीचा भ्रष्टाचार उघड झाला असून न्यायालयाच्या दणक्यामुळे माजी नगरसेवकाचा गरीब शेतकऱ्याची जमीन लाटण्याचा प्रयत्न असफल झाला आहे.
दावडी येथील शेतकरी मारुती पांडू पाटील यांची २० एकर जमीन आहे. या जमीनीवर माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांची नजर होती. त्यांनी हि जमीन हडपण्यासाठी बोगस वारस, फेरफार तयार केला होता. या केस संदर्भात शेतकरी मारुती यांनी १९९४ ते २०१० पर्यंत लढा दिला. त्यानंतर मारुती हे मयत झाल्यानंतर त्यांचे हक्कदार बाळकृष्ण हरीभाऊ पाटील यांनी १२ वर्ष हा लढा सुरु ठेवला.
हा लढा सुरु असताना जालिंदर यांनी बोगस वारस, फेरफार तयार केला व तो फेरफार उपविभागीय अधिकारी, ठाणे यांनी २७ सप्टेंबर २०१० रोजी रद्द केला. तूर्त शासन जमा करून हक्कदार यांना मृत्यू पत्राबाबत सत्यता पडताळणी व वारस दाखला तहसीलदार, कल्याण यांच्याकडे सादर करून निर्णय घेण्याबाबत आदेशित केले.
त्यानंतर हक्कदार यांना न्यायालयाकडून मृत्यूपत्राची सत्यता पडताळून प्रोबेट दाखला देण्यात आला. त्यानंतर सीताराम मारुती पाटील व इतर यांनी समान नावाच्या व्यक्ती फायदा घेऊन २८ फेब्रुवारी २०११ रोजी न्यायलयाची दिशाभूल करून बोगस वारस दाखला मिळवला. त्यानंतर सदरचा बोगस वारस दाखला न्यायालयाने ०६ जून २०१७ रोजी रद्द केला. तसेच, जालिंदर यांनी वासुदेव अनंता भोईर यांना हाताशी धरून २०१० ते २०२१ पर्यंत मुंबई उच्च न्यायलय, दिवाणी न्यायालय, मसूल न्यायलयात महाराष्ट्र शासन व हक्कदार बाळकृष्ण पाटील यांच्या विरोधात खोटे दावे दाखल केले होते. हे सर्व खोटे दावे न्यायलयाने सत्यता पडताळून रद्द केले.
अप्पर जिल्हा अधिकारी, ठाणे यांच्या न्यायालयाने हक्कदार बाळकृष्ण यांच्या बाजूने ११ डिसेंबर २०१८ रोजी निर्णय देऊन तूर्त शासनाची नोंद कमी करून हक्कदार यांच्या प्रोबेट आदेश अनुसार तहसीलदार कल्याण यांच्या न्यायालयाने २५ जून २०२१ रोजीच्या अध्यादेशानुसार हक्कदार बाळकृष्ण यांच्या नावाची सातबारा सदरी ०४ मार्च २०२२ फेरफारमध्ये नोंद करण्यात आली असल्याची माहिती वकील दिपक उनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू