April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण : स्वभाव हा स्त्रीचा दागिना आहे तो जपलाच पाहिजे – कथाकथनकार गडकरी

कल्याण

स्त्रीच्या सौंदर्याचे मोजमाप कधीच होत नसते. आपला स्वभाव चांगला असला तर आपोआप हे जग सुंदर होते असे मत कथाकथनकार आणि वक्त्या प्राची गडकरी यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालय, कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याखानमाला अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. वाचनालयाच्या चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्या सीमा गोखले, निलिमा नलेगलकर, गायिका दीक्षा मोरे उपस्थित होत्या.

अनुभवासारखा शिक्षक नाही. वेगवेगळ्या गोष्टी हाताळणे म्हणजेच प्रयोग करणे आणि याच प्रयोगातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्यातून अनुभव संपन्न व्यक्तिमत्व घडवीत असतो हेच अनुभव घेऊन स्त्री जगत असते तसेच घरातील सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पारही पाडीत असते. यासर्वांतून स्त्रीला सुखाचा मूलमंत्र सापडतो असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या प्राची गडकरी यांनी आपल्या मनोगतातून केले तसेच महिला वाचकांचा सन्मानही केला. गायिका मोरे यांनी आईच्या कृतज्ञतेवर गीत सादर केले.

मुग्धा घाटे, मंगला कांगणे, सानिका जोग, साक्षी शिंत्रे, उषा भांग वाचनालयाच्या या महिला सभासदांनी “अशी मी घडले वाचनातून” या विषयावर मनोगत व्यक्त केले. वेशभूषा स्पर्धेत रेश्मा कांबळे यांनी पारितोषिक पटकावले.

कार्यक्रमप्रसंगी वाचनालायच्या ग्रंथपाल गौरी देवळे, कर्मचारी पूजा चिराटे, कविता मेळेवार, नलिनी पाटील ,संगीता वाघ, माधवी देवस्थळी, स्वाती जानवे, मानसी घोडे उपस्थित होते. सहाय्यक ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याची माहिती सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.

हेदेखील वाचा…

कल्याण : आरटीओ कार्यालयात रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची धडक

कल्याण : संत सावळाराम महाराज विद्यालयाची मनसे आमदारांनी केली पाहणी

Today’s Horoscope : आज दिनांक १४ मार्च २०२२