पराग वर्षा विष्णू सकपाळ
कर्जतजवळील पश्चिम घाट पर्वत रांगेतील माथेरान हे निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
माथेरानच्या जंगलात अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. या पक्षी निरीक्षण ट्रेलसाठी संतोष पेटकर, तेजस पेटकर सहभागी झाले होते आणि मी (पराग सकपाळ, एम.एसी. सूक्ष्मजीवशास्त्र, निसर्ग अभ्यासक) ट्रेल मार्गदर्शक होतो. सकाळी ७ च्या सुमारास आम्ही नेरळला पोहोचलो आणि स्टेशनबाहेर पडताच चहा घेत असताना आम्हाला दोन हरियाल (Yellow-footed green pigeon) दिसले.
आम्ही माथेरानला पोहोचलो तेव्हा एक खवलेदार होला (Oriental turtle dove) आमच्या समोर उडून दूरवर बसला. एक शामा (White Rumped Shama) आमच्या समोर सतत calls करत होता. सिम्पसन्स टँकवर आम्ही अनेक माशीमार (flycatchers) आणि वटवट्या पक्षी (warblers) सक्रियपणे उडताना पाहिले. तिथे अनेक स्वर्गीय नर्तक (Asian paradise flycatchers) पाणी पिण्यासाठी पाण्याच्या डबक्यामध्ये डुबकी मारत होते. तीन किरमिजी सुर्यपक्षी (Crimson-backed sunbird) त्यांच्या आक्रमक हाकेने एकमेकांशी लढत होते.
तेजसला किरमिजी सूर्यपक्षांचे काही छान व्हिडिओ मिळाले. तिथेच काही हिरवट पर्ण वटवट्या ( Green and greenish warblers) टायटलरस पर्ण वटवट्या (Tytlers leaf warbler) झाडाझुडपांमध्ये सक्रियपणे फिरत होते. जवळपास २-३ करडा परीट (Grey wagtail) पाणवठ्याभोवती खेळत होत्या. काही कोतवाल (Black Drongo) इतर पक्ष्यांची नक्कल करत होते आणि सतत आवाज करत होते. अचानक एक (Blue capped rock thrush) निळ्या टोपीचा कस्तुर आमच्या डोळ्यांसमोरून वेगाने गेला आणि झाडांमध्ये नाहीसा झाला.
मग आम्ही बागेच्या भागात गेलो, तिथे आम्हाला पुन्हा खवलेदार होला (Oriental turtle dove) दिसला. संतोष सरांना बागेजवळ लांब शेपटीचा पांढरा शुभ्र स्वर्गीय नर्तक दिसला (Asian paradise flycatcher) आम्ही पुन्हा सिम्पसन्स टाकीवर आलो तेव्हा एका झुडुपाजवळ लाल छातीचा माशीमार (Red breasted flycatcher) काही क्रियाकलाप करत होता.
अशाप्रकारे निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या माथेरान पक्षी निरीक्षणाच्या उपक्रमात सुंदर तीन तास घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
पक्ष्यांचे सर्व छायाचित्र – संतोष पेटकर
हेदेखील वाचा…
पक्ष्यांच्या दुनियेत वावरताना; भांडुप पंपिंग स्टेशन पक्षी निरीक्षण केंद्र
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर