पोलिस आणि न्यायालयाच्या हरकतीनंतर केली कारवाई
कल्याण
पश्चिमेतील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणि कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून फूटपाथवर सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यास केडीएमसीने परवानगी दिली. आता काम पूर्णत्वास आल्यावर त्याचा प्रसाधनगृहाच्या बांधकामावर जेसीबी चालविण्याचे काम महापालिकेने केले आहे. पोलिस आणि न्यायालयाने हरकत घेतल्याने हे काम पाडण्यात आले आहे. मात्र, आधी परवानगी देऊन नंतर काम पाडणे कितपत योग्य आहे असा सवाल शांती सेवा संस्थाने केला आहे.
याठिकाणी या आधी एक मुतारी होती. मात्र, २०१५ साली तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौकपर्यंत रस्ता रुंदीकरण केले. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या मुतारीला पाडून टाकण्यात आले. आता या परिसरातील व्यापारी वर्गास विशेषत: बाजारात येणाऱ्या महिलांना राईट टू पी नुसार मुतारीची सोय नाही. त्यामुळे त्यांची कुंचबणा होत होती. व्यापारी वर्गाची मागणी पाहता. महापालिकेने शांती सेवा संस्थेला त्याठिकाणी प्रसाधनगृह उभारण्यास परवानगी दिली. बांधकाम सुरु करण्याचा दाखला दिला. काम सुरु झाले. त्याला सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाने हरकत घेतली. त्याचबरोबर न्यायालयाच्या संरक्षक भिंतीला लागून हे प्रसाधनगृह नको असे सांगण्यात आले. त्यामुळे जल-मलनिःसारण विभागाने हे काम पाडण्याचे आदेश काढले. महापालिकेने आता काम पूर्णत्वास आले असताना हे काम जमीनदोस्त केला आहे. या पाडकामाचा खर्चही शांती सेवा संस्थेकडून वसूल केला जाईल असे म्हटले आहे.
आमची संस्था ही विधवा महिलांची आहे. परवानगी दिली. त्यानंतर कारवाई केली. त्यामुळे संस्थेचा प्रसाधन बांधकामावर झालेला १२ लाखाचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने हा खर्च भरुन द्यावा. पोलिस आणि न्यायालयाची हरकत होती. तर परवानगीच द्यायची नव्हती. आत्ता पर्यायी जागा द्यावी अशी संस्थेने मागणी केली आहे.
भाविका सोलंकी, शांती सेवा संस्था
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू