April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून लसीकरणास प्रारंभ

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून लसीकरणास प्रारंभ

KDMC : १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या लसीकरणास प्रारंभ

कल्याण

केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाचा शुभारंभ कल्याण पश्चिम येथील बाई‍ रुक्मिणीबाई रुग्णालय येथे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ वर्षाच्या एका मुलीला कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) लसीची मात्रा देवून आज सकाळी करण्यात आला.

केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वर्ष वयोगटातील सुमारे ५५ ते ६० हजार लाभार्थी असून सध्या महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम व शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम येथे सदर लसीची दुसरी मात्रा लाभार्थ्यांना २८ दिवसाच्या अंतराने देण्यात येणार आहे.

ज्या शाळांच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्या शाळांमधील विदयार्थ्यानी, त्यांच्या पालकांनी आजपासून सुरु झालेल्या आपल्या १२ ते १४ वर्ष वयोगटातील पाल्यांचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. यासमयी रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर उपस्थित होते.