April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा

माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा

ठाणे : टोमॅटोमुळे वाहतुकीचे वाजले तीन तेरा

ठाणे

कर्नाटक येथून विरारला टोमॅटो लोड करून ठाण्यातील घोडबंदर रोडकडे निघालेला ट्रक दुभाजकाला धडक देत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गायमुख गावाजवळ उलटला. यामुळे ट्रकमधील टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला होता. तसेच, रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन चालक कर्नाटककडून विरारकडे जात असताना (रस्ता चुकल्यामुळे) गायमुख चौपाटी समोरील रोड दुभाजकावर धडकून घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या रोडवरती येऊन उलटला. यावेळी घोडबंदर रोडवरती मोठ्या प्रमाणात ट्रकमधील टोमॅटो पडल्याने टोमॅटोचा खच पाहण्यास मिळाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि कासारवडवली पोलिस कर्मचारी, कासारवडवली वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. हायड्रॉलिक क्रेनच्या साह्याने रोडच्या बाजुला करण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व जेसीबीच्या मदतीने रोडवरती पडलेले टोमॅटो रोडच्या एका बाजूला करून रोडवरती माती टाकण्यात आली. त्यानंतर घोडबंदर रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.