ठाणे
वागळे इस्टेट येथील मेंटल हॉस्पिटलच्या परीसरातील कक्ष क्रमांक-१९ जवळ सुकलेल्या झाडाची फांदी पडल्याची घटना रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून ती फांदी यशस्वीरित्या बाजूला करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी १-एमर्जन्सी वाहन व १-रेस्क्यु वाहनही पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
हे देखील वाचा…
Today’s horoscope : आज दिनांक २० मार्च २०२२
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी