December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

देशी पिस्तुल बाळगणारा अटक

देशी पिस्तुल बाळगणारा अटक

कल्याण : देशी पिस्तुल बाळगणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण

शिवजयंतीच्या मिरवणुकीचा फायदा घेत उत्तर प्रदेशमधून डोंबिवलीत देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे घेऊन येणाऱ्याला बाजारपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरातून अटक केली आहे. महेश पवनीकर (२२, आजदेपाडा) असे त्याचे नाव आहे. आपण स्वसंरक्षणासाठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस आणल्याचा दावा महेशने केला असला तरी प्रत्यक्षात त्याने हे पिस्तुल कशासाठी आणि कोठून आणले याचा पोलीस शोध घेत आहेत.

शिवजंयतीनिमित्ताने पोलिसांनी मनाई आदेश लागू केला होता मात्र या आदेशाचा भंग करत महेश पवनीकर याने विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या जवळ बाळगले होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान पश्चिमेकडील रेतीबंद रोड नजीक गोविंदवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, हे पिस्तुल आपण उत्तर प्रदेश मधून आणले असल्याचे सांगत आपला अनेक जणांशी वाद असून या वादातून आपल्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने आपण स्वसंरक्षणासाठी हे पिस्तुल स्वतः उत्तर प्रदेशमधून खरेदी करून आणल्याचा दावा महेशने पोलीस तपासात केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पिस्तुल जप्त करत महेशला अटक केली असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे  वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.