ज्योती नगरमधील महिलांनी आय प्रभाग कार्यालयाबाहेर मांडला ठिय्या
कल्याण
चिंचपाडा गावातील ज्योती नगरमधील महिलांनी रस्ता, पाणी, लाईट या सुविधा नसल्याने आय प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत प्रभाग कार्यलयावर धडक देत ठिय्या मांडला.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावातील ज्योती नगरमध्ये रस्ता, लाईट, पाणी याची गेले तीन ते चार वर्षांपासून मोठी समस्या आहे. याकरिता स्थानिक रहिवाशांनी आय प्रभाग कार्यालय आणि मुख्यालयापर्यंत पत्रव्यवहार करून, मोर्चे काढून देखील दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ज्योती नगरमधील महिला केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून बसल्या. यानंतर बांधकाम विभागाकडून बालाजी पॅरेडाइज्जवळील रस्ता खड्डा भरून दोन दिवसात दुरुस्त करून देतो असे आश्वासन केडीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
लाईट, पाण्याची समस्या देखील तात्काळ केडीएमसीकडून सोडवली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याचे प्रचिती कदम यांनी सांगितले.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी