मुंबई
मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना आज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी तसेच ताबापत्रांचे वाटप करण्यात आले.
विधानभवन येथील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राजशिष्टाचार, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य तथा परिवहन मंत्री अनिल परब, आमदार दिलीप लांडे आदी उपस्थित होते.
मिठी नदी शेजारील क्रांतीनगर, संदेशनगर परिसरातील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांचे एचडीआयएल संकुल, प्रीमियर कॉलनी, कुर्ला (प) येथे पुनर्वसन करण्यात येत आहे. सन २००५ च्या अतिवृष्टीमध्ये क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामनडायापाडा या परिसरात मोठी हानी झाली होती. त्यामुळे या परिसरातील बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी सन २००८ मध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या सदनिकांचे ताबा पत्र व चाव्यांचे वाटप संबंधित सदनिकाधारकांना करण्यात आले. यावेळी उपस्थित सदनिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर