December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

'महायुवा अॅप’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

'महायुवा अॅप’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ‘महायुवा अॅप’चे अनावरण

मुंबई

शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्या दरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा अॅप’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सूरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.

या अॅपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या अॅपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.