December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Image/Google

Image/Google

महाराष्ट्र : सीएनजी वाहनधारकांसाठी खुशखबर

अजित पवारांच्या निर्णयामुळे इंधन होणार स्वस्त

मुंबई

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या निर्णयानुसार सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिल (शुक्रवार) पासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

राज्य सरकारच्या सीएनजीवरील कर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे.

पर्यावरणपूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूचा पीएनजी म्हणजेच घऱगुती वापर होतो. तसेच सीएनजीवर चालणारी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर साडे तेरा टक्केवरून तीन टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधिमंडळात उपमुख्यमंत्री पवार यांनी तशी घोषणा केली.