December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाणे : राष्ट्रीय मौखिक आरोग्य; आदिवासी मुलांच्या दातांची तपासणी

मुलांना केले ब्रश आणि पेस्टचे वाटप

ठाणे

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमात १६० आदिवासी लहान मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१० दांतावर सीलंट लावून भविष्यात किडणाऱ्या दांतावर संरक्षण कवच निर्माण केले गेले आहे. या कार्यक्रमातून आदिवासी मुलांचे मौखिक आरोग्य सुदृढ राहणार आहे. त्याचबरोबर पुढच्या घडणाऱ्या पिढीला मौखिक आरोग्याचे चांगले संस्कार मिळण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी वर्तवला आहे. याचदरम्यान त्या मुलांना ब्रश आणि पेस्टचे वाटप करण्यात आले.

खडवली येथील आदिवासी आश्रम शाळेमधील लहान आदिवासी मुलांसाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी आदिवासी शाळेचे सर्वेसर्वा पंकज पाटील यांनी केले होते. या माध्यमातून पीट व फिशर सीलंट बसवण्याचा कार्यक्रम राबवला गेला. यावेळी शासकीय दंत महाविद्यालय मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पाडवे यांच्यासह डॉ. विलास तकटे (असोसिएट प्रोफेसर पिडोडोंटिक्स डिपार्टमेंट, सेंट जॉर्ज रुग्णालय व दंत महाविद्यालय) व ठाणे सामान्य रुग्णालयाच्या दंत विभागाच्या मुख्य दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार आणि डॉ. अग्रिमा अग्रवाल (लेक्चरर पिडोडोंटिक्स विभाग) व डॉ. भाग्यश्री पवार (पिडोडोंटिस्ट सामान्य रुग्णालय ठाणे) आदी उपस्थित होते.