डोंबिवली
काटई नाका परिसरात असलेले एटीएम फोडताना मानपाडा पोलिसांनी चोरट्याला रंगेहात पकडले आहे. शटर बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रील मशिनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून राहुल प्रमोद चोरडीया (३५, रा. इंदोर) याला पकडले. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो एटीएम मशीनमध्ये कॅश लोड अनलोड करणाऱ्या कंपनीत काम करत असल्याचे चौकशी समोर आले.
अटक करण्यात आलेल्या राहुल कडून एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्क्रू-ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तू आढळून आल्या आहेत.
शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या एका बँकेचे एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता आतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी हळूच शटर उघडल्यानंतर राहुलने पोलिसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून त्याच झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने फोडून गुन्हे केले असावेत असा पोलिसांना संशय आहे.
सदरची कामगिरी मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सर्जेराव पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दीपक गडगे, भारत कांदळकर, प्रवीण किनरे, महादेव पवार, यलाप्पा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा, तिडके यांचे पथकाने केली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर