कल्याण
अचिव्हर्स बिजनेस इनक्यूबेटरने आयोजित केलेल्या ‘सर्वोत्तम बिझनेस आयडिया २०२२’ प्रेझेंटेशनसाठीची दुसरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गुरुवार, २४ मार्च रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते.
उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून सीए. कौशिक गडा (अध्यक्ष, WIRC, ICAI चे कल्याण-डोंबिवली शाखा), प्रमुख वक्ते सीए. व्योमेश पाठक, अतिथी दिनेश इसराणी, अॅड. रुपाली ठाकूर, प्रा. डॉ. दिनेश गुप्ता, प्राचार्या सोफिया डिसोझा आणि अध्यक्ष डॉ. सीए. महेश भिवंडीकर यांच्यासह कार्यक्रमाच्या संयोजिका सना खान तर उपसंयोजक अनिकेत पाटील उपस्थित होते.
यावेळी २४ व्यावसायिक कल्पना मांडण्यात आल्या. ज्याचे परीक्षक अॅड. ठाकूर, इसराणी, जितेंद्र नेमाडे, सुमित पाटील, तुषार जोशी, हेमंत मुंडके आणि अध्यक्ष डॉ. सीए महेश भिवंडीकर यांनी केले. या स्पर्धेत देशभरातून सहभाग दिसून आला. प्रथम पारितोषिक अचिव्हर्स कॉलेजचे विद्यार्थी राज सोनी यांनी पटकावले, व्दितीय पारितोषिक ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झालेल्या तिरुपती येथील ४ स्पर्धकांच्या संघाने पटकावले. तर, तिसरे पारितोषिक एसएसटी कॉलेजचे श्रीकर कुलकर्णी यांनी पटकावले.
हे सत्र खूपच रोमांचक होते कारण सहभागींनी विविध श्रेणी आणि स्केलच्या कल्पना आणल्या होत्या. स्पर्धेचा समारोप प्रमाणपत्र वितरण व विजेत्यांच्या सत्काराने झाला. सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून अचिव्हर्स कॉलेजचा संपूर्ण कर्मचारी वर्ग आनंदित झाला.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर