सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरची साहसी कामगिरी
कल्याण
इतिहासात पहिल्यांदाच नवरा-नवरी या दोन सुळक्यांवरून झिप्लायनिंग करत कल्याणच्या सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर या साहसी गिर्यारोहण संस्थेने यशस्वी कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहा वर्षीय ग्रीहिता विचारे हिने देखील झिप्लायनिंग केली आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असंख्य आणि उंचच उंच सुळके आहेत. त्यातील प्रमुख आकर्षण असते ते ‘नवरा-नवरी’ सुळक्यांचे. नवरा-नवरी सुळखे म्हणजे एकाच डोंगरावर आजूबाजूला उभे असलेले सुळखे. असेच नवरा नवरी सुळके त्रिंबकेश्वर गावातील पहिने हद्दीतील लक्ष्मणपाडा या छोट्या वाडीच्या बाजूला पाहायला मिळतात. नवरी सूळख्याची उंची सुमारे २८० फूट उंच असून नवरा सूळख्याची उंची ही सुमारे २६० आहे. सोबतच ह्या नवरा-नवरी सुळख्याच्या आजूबाजूला श्री हनुमान ह्यांच जन्मस्थान असलेले अंजनेरी पर्वत, भांडरदुर्ग, भास्करगड, हरिहर असे उंच पर्वत पाहायला मिळतात.
वय वर्षं केवळ ६ असलेल्या कल्याणच्या ग्रीहिता या चिमुकल्या मुलीचे महाराष्ट्र राज्याची पारंपरिक वेशभूषा अर्थातचं नववारी साडी नेसून सुमारे २ हजार फूट उंचीवरून दोन सूळक्यांवरून झिप्लायनिंग द्वारे यशस्वी रित्या मोहीम फत्ते केली आहे. सकाळी ६ वाजता लक्ष्मणपाडा येथून सूळक्याच्या माथ्यावर चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे १ तासाचा ट्रेक केल्यानंतर नवरा-नवरी सुळख्यांचा पाया गाठला गेला. “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” या गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेल्या संघाने ग्रीहिता हिला प्रस्तरारोहण चे साहित्य योग्य रितीने लावून तिला चढाई साठी तयार केले.
त्यात कंबरेला बांधलेले हर्णेस, डोक्यावर हेल्मेट, झूमर असे विविध साहित्य तपासले. अथक प्रयत्न केल्यानंतर नवरी सूळक्यावर ग्रीहिता पोहचली. जिथे सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांनी एक दिवस आधीच झिप्लायनिंगचा सेटअप लावला होता. ग्रीहिताने झिप्लायनिंगद्वारे यशस्वी चढाई करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या मदतीने कल्याण शहराच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.
सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, कल्पेश बनोटे, राजेश गायकर, अक्षय जमदरे, प्रदीप घरत, सुनील खणसे, रसिका येवले, विकी बुरकुले, महेंद्र भांडे, भावेश संकपाळ, ऋषीकेश बापर्डेकर, विश्वनाथ सुर्वे आणि स्वप्नील भोईर यांचे ग्रीहिता ला मोलाचे सहकार्य लाभले.
पहिनेच्या नवरा नवरी सुलक्यांच्या इतिहासात पहिल्यांदाचं दोन सूळक्यांमध्ये दोरीवर लटकून सुळके पार केले म्हणून पहिने ग्रामचे पोलीस पाटील यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या उपस्थित असलेल्या दर्शन देशमुख, भूषण पवार, रसिका येवले, अक्षय जमदरे, प्रदीप घरत यांचा विशेष सत्कार करून पुढील वेळी दोन्ही सुलक्यांवर महाराष्ट्र राज्याची ओळख असलेला भगवा ध्वज लावून द्यावा म्हणून विनंती केली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर