December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

गावामध्ये चौफेर वृक्ष दिंडी फिरविण्यात आली

गावामध्ये चौफेर वृक्ष दिंडी फिरविण्यात आली

कल्याण : वनविभागाच्या वतीने वृक्ष दिंडी सोहळा व जनजागृती सभा

कल्याण

जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र पडघा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पहारे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी पहारे गावात गावदेवी मंदिरात वृक्ष दिंडी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पालघर संजय धारावणे यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपटे ठेवून तसेच गावातील महिलांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर गावदेवी मंदिरापासून पहारे गावातील तरुणांनी, महिलांनी, लहान बालकांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी मोठया प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी नाचून भजने गाऊन कार्यक्रमात उत्साह आणला. हभप महेंद्र महाराज आणि शांताराम भोईर यांनी भजने गायली. गावामध्ये चौफेर वृक्ष दिंडी फिरविण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी पालखी पुजन केले. त्यानंतर गावदेवी मंदिरात सभा घेण्यात आली.

या कार्यक्रमात सूत्रसंचालन वनपाल किरवली साहेबराव खरे यांनी केले. सेवानिवृत्त वनाधिकारी, चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जनजागृती केली. तसेच प्रमुख पाहुणे वनक्षेत्रपाल धारावणे वनरक्षक व पदो. वनपाल संघटनेचे ठाणे वृत्तीय अध्यक्ष अर्जुन निचिते, वनरक्षक व वनपाल संघटना, ठाणे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनीही भाषण केले. संघटनेचे प्रतिनिधी महेंद्र साबळे, वनपाल विठ्ठल दरेकर यावेळी उपस्थित होते.

स्थानिक जेएफएम अध्यक्ष नीलम भोईर, पोलीस पाटील भरत भोईर, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील, वनसंरक्षण समिती अध्यक्ष नितिन पाटील, स्वच्छता निरीक्षक अधिकारी दीपक भोईर, ग्रामस्थ अनिकेत पाटील, मंगेश पाटील यांनी वृक्षदिंडीत जनजागृती केली. तसेच इतर तरुण वर्ग आणि दिलीप माळी उल्हासनगर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वनविभागाला सदैव सहकार्य करणारे व वनवणवा विझविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना प्रशस्तीपत्र देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.