नववर्षाचे स्वागत करा ‘सेल्फी विथ गुढी’ने
तुमचा आनंद आमच्यासोबत करा द्विगुणीत
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना एकत्र येण्याची, आनंद व्यक्त करण्याची संधी मिळते. तुमच्या या आनंदाला द्विगुणीत बनविण्यासाठी गुढीसोबतचे तुमचे, कुटुंबाचे किंवा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसोबतचे फोटो आम्हाला पाठवा. त्यासाठी तुम्ही गुढीसमोर उभे राहून फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे. त्यातील निवडक फोटो आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. यावर्षी हे क्षण तुम्हाला ‘The News Tracks’ बरोबर शेअर करून आनंद द्विगुणीत करण्याची संधी मिळणार आहे.
हे फोटो email@thenewstracks.com या मेल आयडीवर पाठवा. तुमचे नाव आणि राहण्याचे ठिकाण सुद्धा असणे आवश्यक. शनिवार ०२ एप्रिल २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेले फोटो गृहीत धरले जातील.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर