सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंचच्या वतीने विशेष स्पर्धेचे आयोजन
कल्याण
येथील सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंच या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधत खास राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा गुढीपाडवा स्वागतयात्रा” (कॅमेरा फोटोग्राफी) (विषय पहिला) व ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ (मोबाईल फोटोग्राफी) (विषय दुसरा) या दोन संकल्पनांवर आधारित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना मंगळवार, ५ एप्रिल २०२२ पर्यंत आपली निवडक छायाचित्रे आयोजकांपर्यंत ई-मेलव्दारे पाठवायची असून स्पर्धेतील विजेत्या व सहभागी छायाचित्रकारांना भरगोस पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.
कल्याण : शाळा दत्तक घेऊन तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत – केडीएमसी आयुक्त
तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र कोरोनो निर्बंधमुक्त होत आहे. मराठी नववर्षाच्या निमित्ताने होणारी ही नवी नांदी मराठी जनांच्या आयुष्यात नवचैतन्य आणेल यात मुळीच शंका नाही. याच आनंदाला आणखी व्दिगुणीत करण्याचा प्रयत्न कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंच या सामाजिक व सांस्कृतिक संस्था करत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त संबंध महाराष्ट्रात स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. या स्वागतयात्रांमध्ये अबालवृध्दांपासून सर्वच स्तरातील व्यक्तींचा उत्साहाने सहभाग असतो. सांस्कृतिक पेहराव, ढोल ताशांच्या तालावर थिरकणारी तरूणाई, निरनिराळे देखावे, वेशभूषा, सांस्कृतिक-सामाजिक चित्ररथ यासारख्या निरनिराळ्या गोष्टींचे प्रदर्शन या स्वागतयात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वागतयात्रांमधील हे क्षण टिपून त्याला कलाकृतीची जोड देण्याचा अनोखा प्रयत्न सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. “महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा गुढीपाडवा स्वागतयात्रा” (कॅमेरा फोटोग्राफी) व ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ (मोबाईल फोटोग्राफी) या दोन संकल्पनांवर आधारित ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांना मंगळवार ५ एप्रिल २०२२ पर्यंत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा गुढीपाडवा स्वागतयात्रा” या संकल्पनेवर स्वतः कॅमे-यातून काढलेली कोणतीही पाच छायाचित्रे (१०×१२ या साईझमध्ये) व ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ या संकल्पनेवर आधारित कोणतेही मोबाईलमधील तीन सेल्फी हे swkswagatyatra@gmail.com या ई-मेल आयडीवर स्पर्धकाने फोटो कॅप्शन, लोकेशन व स्वतःच्या संपूर्ण माहितीसह पाठवायची आहेत. उत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम, व्दितीय व तृतीय तसेच इतर उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
छायाचित्र प्रदर्शन
सुभेदार वाडा कट्टा व कल्याण सांस्कृतिक मंचच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात येणा-या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेतील सहभागी निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनाप्रसंगी पारितोषिक विजेत्या छायाचित्रकारांना गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क-
अर्जुन पाटील- ९०८२४४९८४३
संजय पांडे- ९८१९२८८६८०
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण