कल्याण
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच, हिंदू नववर्ष या निमित्ताने गेल्या २० ते २२ वर्षांपासून शहरात स्वागत यात्रेच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा होत असतो. मागील २ वर्षात कोरोनामुळे या उत्सवावर सावट आले होते. ते सावट आता दूर झाले असून नव्या जोमाने नव्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय सज्ज झाले असून त्यानिमित्ताने वाचनालयाच्या प्रवेशद्वारावर आगळ्या वेगळ्या स्वरुपाची पुस्तक गुढी उभारण्यात आली होती. त्या गुढीचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी व त्यांच्या पत्नी माधवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाचनालय पूर्णक्षमतेने मुक्त प्रवेशद्वार स्वरुपात खुल करण्यात आले आहे.
वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, सीमा गोखले वाचनालयाच्या ग्रंथसेविका उपस्थित होत्या.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर