कल्याण
कल्याण पश्चिमेत गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे खंडित झालेली हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याची स्वागतयात्रा यंदा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या स्वागतयात्रेत पालखी सोहळा तसेच सुयोग महिला भजनी मंडळ, स्वरांश ढोल ताशा पथक, डॉक्टर पंकज पत्की यांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
यंदाच्या गुढीपाडव्याच्या सोहळ्याची जबाबदारी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, कल्याण शहर अध्यक्ष महेश केळकर व सर्व पदाधिकारी यांनी पार पाडली. या स्वागत यात्रेत माजी आमदार नरेंद्र पवार, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुळकर्णी, ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर, कल्याण संस्कृती मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेची परंपरा कायम
अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक, पारनाका, लाल चौकी या पालखीच्या मार्गावर पालखीचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सर्वतोपरी सहकार्य लाभल्याची माहिती अखिल भारतीय ब्राम्हण युवा आघाडीचे अध्यक्ष सारंग केळकर यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर