December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवली : बीपीसीएल भूमिगत डिझेल पाईपलाईनमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता

डोंबिवली

एमआयडीसी औद्योगिक आणि निवासी भागातून सर्व्हिस रोडचा कडेने भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल वाहून नेणारी उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन भूमिगत पाइपलाइन जात आहे. तसे जागोजागी बीपीसीएल यांनी फलक लावले आहेत. मात्र याठिकाणी देखील बीपीसीएल भूमिगत डिझेल पाईपलाईनमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून याच निवासी भागातील पाइपलाइनच्या कडेला मोठ्या झोपड्या व इतर अनधिकृत बांधकामे होत आहेत. येथील नागरिकांनी याची माहिती एमआयडीसी, केडीएमसी यांना दिली आहे. या भूमिगत पाइपलाइन जवळच झोपडपट्टीतील रहिवाशी त्यांना लागणारे अन्न पदार्थ उघड्यावर शिजवित असतात. कालच याच भूमिगत पाइपलाइन मधून शिळ महापे मार्गावर पाईपला छिद्र पाडून डिझेल चोरीचे प्रकार उघडीस आले आहेत. त्यातून मोठी धोकादायक आग लागली होती. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला मोठे परिश्रम करावे लागले. सुदैवाने तेथे मानवी वस्ती नसल्याने कोणतीही मानवी हानी झाली नाही. परंतु आगीमुळे मोठ्या प्रमाणात झाडांना व नाल्यांना आग लागली होती.

भविष्यात येथील पाइपलाइन मधून अशाच प्रकारे डिझेल चोरीचा घटना घडू शकतात किंवा इतर कारणामुळे येथे आग लागल्यास येथे जवळच मोठी मानवी वस्ती, रासायनिक कंपन्या आणि पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. यापूर्वी येथील याच पाइपलाइन जवळील कचऱ्याला मोठी आग लागली होती. प्रशासनाने वेळीच याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. नाहीतर भविष्यात दुर्घटना घडली तर याला एमआयडीसी, केडीएमसी जबाबदार राहतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिला आहे.