December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : संभाजी ब्रिगेडची कल्याण डोंबिवली कार्यकारणी जाहीर

कल्याण

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले व ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश देसाई यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व येथे कल्याण डोंबिवली महानगरचे अध्यक्ष अशोक गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कल्याण डोंबिवली महानगरच्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आकाश डुंबरे, ठाणे जिल्हा संघटक सतीश भोसले व माजी कल्याण डोंबिवली महानगर संघटक प्रिया शिर्के तसेच संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या या कार्यकारणी मध्ये प्रविण भैलूमे (कल्याण डोंबिवली महानगर सचिव), श्रीनाथ करकरे (कल्याण डोंबिवली महानगर उपाध्यक्ष), जालिंदर बंगाळे (कल्याण डोंबिवली महानगर कार्याध्यक्ष), संतोष शेलार (कल्याण डोंबिवली महानगर उपाध्यक्ष), संतोष जाधव (कल्याण डोंबिवली महानगर संघटक), शंकर यशोद (कल्याण पूर्व अध्यक्ष), गौतम घोडके (कल्याण पूर्व उपाध्यक्ष), सईदा सिद्दीकी (कल्याण पूर्व उपाध्यक्ष), दिलीप कदम (कल्याण पूर्व संघटक), सुदेश मोहिते (कल्याण पूर्व संघटक), विजय भोसले (कल्याण पूर्व विभाग प्रमुख), नारायण सपकाळ (कल्याण पूर्व विभाग प्रमुख), मोहन चव्हाण (कल्याण पश्चिम अध्यक्ष), किशोर खारोळे (कल्याण पश्चिम संघटक) आदींचा समावेश आहे.