December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अभिनव विद्यालयात भरली बालवाडीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाची कार्यशाळा

कल्याण

अभिनव विद्यालय, एमआयडीसी, डोंबिवली या शाळेत आज सिनियर केजी बालवाडीच्या विद्यार्थ्यांची आंतरशालेय स्तरावरील प्रयोगासहित विज्ञानाची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात अभिनव विद्यालयाबरोबरच ज्ञानमंदिर, मान्सून, एनइएस आदी शाळांच्या सिनियर केजीच्या जवळ पास ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ही प्रयोगशाळा अतिशय यशस्वी झाली. यासाठी सचिव प्रोदिप्ता सोनी यांनी मार्गदर्शन केले तर प्राचार्या डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

एक मजबूत समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा मजबूत पाया हवा आहे. त्यामुळे विज्ञान जागृतीसाठी ‘छोट्यांना पकडा’ हे वाक्य आम्ही अमलात आणले. बालवाडीत विज्ञान का? त्यासाठी खूप लहान नाहीत का? असा प्रश्न अनेकांना पडतो .खरे म्हणजे प्रत्यक्षात तसे नाहीये. विज्ञान मुलांना प्रोत्साहन देते आणि या जगातील प्रत्येक गोष्ट कशी शोधायची हे शिकवते. विज्ञान शिकल्यामुळे मुलांची या ग्रहाबद्दल लाखो गोष्टी जाणून घेण्याची नैसर्गिक उत्सुकता पूर्ण होते. विज्ञान शिकणे म्हणजे विद्यार्थांना, कल्पना करणे, माहिती काढणे, विश्लेषण करणे आणि तथ्ये तपासणे शिकवते.

आजच्या विज्ञान कार्यशाळेत बालवाडीच्या मुलांनी त्यांच्या लहान हातांनी आणि उत्साही मनाने दैनंदिन विज्ञानाबद्दल अनेक गोष्टींच्या नोंदी केल्या, विश्लेषण केले, निष्कर्ष काढले आहेत. प्रयोगा दरम्यान आणि नंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून शिक्षकांना देखील खूप समाधान वाटले. त्यांनी अतिशय सर्जनशील आणि सोप्या पद्धतीने विविध द्रव, घनता, द्रावण आणि विद्राव्यता शोधून काढली. आम्हाला आशा आहे की विज्ञानाबद्दलचा हा उत्साह त्यांचा वैज्ञानिक पाया मजबूत करेल अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.