December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण : मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा; हजारो पोस्टकार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

युवा सेनेचा कल्याण पूर्वेतील महाविद्यालयात उपक्रम

कल्याण

मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची हजारो पोस्ट कार्ड आज युवा सेनेच्या वतीने राष्ट्रपतींना रवाना करण्यात आली. पूर्वेतील साकेत महाविद्यालयाबाहेर युवा सेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी, युवासेना उपजिल्हाधिकारी भूषण यशवंतराव, शहर अधिकारी रोहित धुमणे, जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील, जिल्हा चिटणीस स्नेहा जाधव, शहर समन्वयक विक्की जोशी, शहर चिटणीस धनराज पाटील, सचिव मधुर म्हात्रे, सागर घायवट, तेजस देवकाते, रत्नेश महाडिक, कॉलेज कक्ष चेतन पाटील, उपजिल्हा समन्वयक आर्या वाडेकर, शहर अधिकारी श्रद्धा यादव, शहर समन्वयक दीपिका केळजी, शाखा अधिकारी रोशनी पिंगळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत सरकारने २००४ साली भाषांना “अभिजात” भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. ह्याला आता अनेक वर्ष उलटून गेली. साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणं गरजेचे आहे. मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. ह्या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे साबित होते की मराठी ही अभिजात भाषा आहेच.

त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविण्याचा उपक्रम कल्याण लोकसभेतील युवासेनेतर्फे राबविण्यात आला. युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविले जात असून विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास युवासेनेशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील यांनी केले आहे.

तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज येथे पोस्ट कार्ड वर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून युवा सेने मार्फत पोस्टाद्वारे राष्ट्रपतींना हि हजारो पत्रे पाठविण्यात आली असून या उपक्रमाला विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सचिव मधूर म्हात्रे यांनी दिली.