ठाणे
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांच्या मातोश्री शकुंतला जाधव (वय ७९) यांचे आज दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मालेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर