कल्याण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले. पत्रीपूल येथे स्नेह वर्धक नगरच्या वतीने साकारण्यात आलेला देखावा आंबेडकरी जनतेच्या चर्चेचा विषय ठरला होता.
‘जखडबंद पायातील साखळदंड तटातून तुटले ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भिमा तुझ्या जन्मामुळे’ हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. यामध्ये भारतीय संविधान आणि संसद भवन साकारण्यात आले आहे.
हा देखावा पत्रकार अशोक कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून याची सजावट कैलास कांबळे, नदीम शेख, स्नेह वर्धक मित्र मंडळाने केली आहे.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी