चिपळूण
तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुल येथे दिनांक १६ ते दिनांक १८ एप्रिल दरम्यान लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली लंगडी असोशिएशन ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून १२ वी महाराष्ट्र राज्य लंगडी निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष वैभव विरकर, उद्योजक व डेरवण स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष योगेश विचारे, क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर, लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव चेतन पागवाड, स्पर्धा प्रमुख पंच व वसई सचिव विवेक धावडेकर, मुंबई सचिव माधुरी मॅडम, जिल्हा संघटना कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, तायक्वांदो जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, स्क्वॅश जिल्हा सचिव भरत कररा, टेनिक्वाईट जिल्हा सचिव मनीष काणेकर, चिपळूण तालुका शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष सोमनाथ सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेला पंचमुख म्हणून विवेक धाडवेकर, तसेच महेंद्र काणेकर, चेतन कदम, नूतन देवाळे, अनिश शिंदे, प्रतीक ठोंबरे, प्रॉमिस सैतवडेकर यांनी काम पाहिले.
लंगडी जिल्हा संघटना अध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम, संघटना पदाधिकारी प्रकाश आंब्रे, संतोष भोसले, शशांक घडशी, उदयराज कळंबे, जयरत्न कदम, अमरसिंग भाट आदी मान्यवरांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह