December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ रग्बी महिला संघाला विजेतेपद

कल्याण

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठात प्रथमच झालेल्या रग्बी स्पर्धेत ५०० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यात मुंबई विद्यापीठ महिला संघाने अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले. यात एसएसटी महाविद्यालयातील २ महिला खेळाडू हिमायावती गवळी आणि सपना यादव यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धा १२ ते १५ एप्रिल च्या दरम्यान सेंच्युरी रेयॉनच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.

मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले यांनी सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले. तसेच एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, महाविद्यालयाचे मार्गदर्शक राजेश मानवडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.