नवी मुंबई
कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून चार हजार ९१० पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. ५० टक्क्याहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली.
२८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. ०८ एप्रिल २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत १ हजार ४२५, रायगड जिल्ह्यातील आगारांत १ हजार ६४४, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत १ हजार १२५ आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत ७१६ कर्मचारी संप सोडून कमावर हजर झाले आहेत.
कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
अंबरनाथमध्ये विकासकामांना गती : खा. शिंदे यांचा आढावा
समाज जागृतीत योगदानासाठी स्टडी व्हेवजला पुरस्कार