December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अग्निशमन सप्ताहास नागरिकांचा प्रतिसाद

कल्याण

१४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण भारतात अग्निशमन सेवा सप्ताह आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिका क्षेत्रात असलेल्या आधारवाडी अग्निशमन केंद्र, एमआयडीसी अग्निशमन केंद्र, ह प्रभाग अग्निशमन केंद्र, ड प्रभाग अग्निशमन केंद्र, टिटवाळा अग्निशमन केंद्राच्या परिसरात, विविध ठिकाणी अग्निशमन व आणिबाणी विभागामार्फत प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करुन पॅम्पलेट व माहिती पुस्तिका यांचे वितरण करण्यात आले.

महापालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी विभागामार्फत महापालिका परिसरातील शाळा, दवाखाने, खाजगी दवाखाने, गृहसंकुले, गर्दीचा परिसर, स्टेशन परिसर येथे प्रात्याक्षिके दाखवून तसेच आग लागल्यावर करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांबाबत त्याचप्रमाणे उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करुन जिवीत व वित्त हानी कशी वाचविता येईल याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली, त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.