December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

कल्याण

शुक्रवारी कर्नाटक संघाच्या मंजूनाथ वाणिज्य महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रिय सेवासंघ व कडोंमनपा आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक वसुंधरा दिना’चे औचित्य साधून वृक्षारोपण, वृक्ष नामकरण आणि स्वच्छता अभियान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानाला कडोंमनपाचे सहाय्यक आयुक्‍त राजेश सावंत यांचे सक्रिय सहकार्य लाभले.

सीए यु. पी. पै, डॉ. सुशिला विजयकुमार, मंजुनाथ वाणिज्य महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व इतर शिक्षक समूहाने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. प्लॅस्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ९० फुट रस्त्यावर भाजी बाजारात प्रत्यक्ष कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यात कडोंमनपा आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले, प्रा.पुष्कर देशपांडे, प्रा. दिलीप नाझीरकर, प्रा. निशा देवधर, प्रा. माधुरी महाराव (सदस्य,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष), प्रा. शमिका भगत, प्रा.प्राजक्ता सापुते, माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग लाभला.

स्वच्छता अभियानाला महाविद्यालयाच्या प्रांगणापासुन आरंभ झाला व समारोप खंबाळपाडा कमानीजवळ झाला. डॉ. श्रेया भानप (पर्यावरण दक्षता मंच), वनस्पतीतज्ञ यांचे वृक्षनामकरण उपक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अशा प्रकारे सर्वांच्या सहभागाने व सहकार्याने ‘जागतिक वसुंधरा दिन’ यशस्वीरित्या साजरा केला गेला.