टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाउंडेशनने शिक्षण मंडळ कार्यालयात मांडला ठिय्या
कल्याण
टिटवाळ्यातील खाजगी शाळा आरटीई योजनेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार देत असून याबाबत टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाउंडेशनने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्याची अन्यथा शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. तर या शाळांसोबत बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे.
टिटवाळ्यातील मेरीडीयन शाळा आणि रवींद्र शाळेमध्ये आरटीई उपक्रमात विद्यार्थांना प्रवेश दिला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या पुस्तके, गणवेश, शाळेची बस या सुविधा देण्यास शाळा प्रशासन नकार देत आहे. शालेय साहित्य मोफत देण्याचा शासनाचा आदेश असताना शाळा पालकांकडून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी करत आहेत. त्याअनुषंगाने याआधी देखील शिक्षण अधिकाऱ्यांची याबाबत भेट घेतली. तेव्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने या शाळांना पत्र काढून आरटीई विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्याच्या सूचना केल्या. मात्र तरी देखील शाळांनी या आदेशाला न जुमानता पालकांना हे शैक्षणीक साहित्य विकत घेण्याची सक्ती केली जात आहे. त्याच्याच निषेधार्थ आज शिक्षण मंडळ कार्यलयात ठिय्या आंदोलन केल्याचे विजय देशेकर यांनी सांगितले.
तर उद्या याबाबत शिक्षण अधिकार्यांनी बैठक बोलावली असून या बैठकीत सकरात्मक निर्णय न झाल्यास ठाणे जिल्हा शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक मुंबई याठिकाणी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील देशेकर यांनी दिला आहे.
शाळांसोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे आश्वासन
गेले दोन वर्षे कोरोना कालावधीत शाळा बंद होत्या. आता शाळा नियमित सुरु झाल्यानंतर आरटीई अंतर्गत ज्या विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार मोफत शालेय साहित्य पुरविणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही मेरिडीयन शाळा आणि रवींद्र शाळेबद्दल पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या शाळांना आरटीई विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना केल्या असल्याची माहिती शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर