December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Archived Potographs

Archived Potographs

रिक्षा प्रवास तक्रार हेल्पलाइन सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रिक्षा चालकांच्या बाबतीत प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांशी उध्दट वर्तणुक अशा प्रकारच्या रिक्षा चालकांच्या बाबतीत प्रवाशी नागरिकांच्या तक्रारी नित्यरोज वाढत असून प्रवासी नागरीक हैराण झाले आहेत.

रिक्षांची अमाप संख्या व प्रंचड वाढलेली वाहतुक यंञणावर वाढलेला ताण आरटीओ वाहतुक पोलिस प्रशासन ही हतबल झालेल आहे. आरटीओची रिक्षा प्रवास तक्रार हेल्पलाइन बंद आहे. मध्यंन्तरी कल्याण आरटीओने व्हाटस्अँप नंबर रिक्षा प्रवास हेल्पलाइन जारी केला होता. पंरतु उपरोक्त हेल्पलाइन क्रमांक परिणामकारक नाही. यामुळे रिक्षा प्रवासी तक्रार व निवारण कुठे करायची संभ्रमात पडतात. शासनाने रिक्षा परवाने विनाशर्त खुले केल्यामुळे अपप्रवृत्ती विना लायसन्स बॅच अल्पवयीन रिक्षा चालकांचे प्रमाण रिक्षा व्यवसायात वाढलेले आहे. त्याच प्रमाणात रिक्षा चालकांच्या बाबतीत प्रवासी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मुबंई शहरात वाहतुक पोलिस व आरटीओ यांची संयुक्तिक हेल्पलाइन टॅक्सी प्रवास तक्रार निवारण उपलब्ध करून देण्यात आली आहे. टँक्सी प्रवास प्रवाशांची तक्रार ताबडतोब घेऊन वाहतुक पोलिस व आरटीओ यांच्याकडुन तक्रारी ची खातरजमा करून टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. मुबंई शहरात हेल्पलाइन माहिती व जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

मुबंई वाहतुक पोलिसांचे धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक पोलिस व आरटीओ संयुक्तिक रिक्षा प्रवास तक्रार हेल्पलाइन सुरू करावी व हेल्पलाइन क्रमांक सार्वजनिक प्रदर्शित करावा अशी मागणी प्रवासी नागरीक करीत आहेत.