December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पत्रकार दामुभाई ठक्कर

शतायुषी पत्रकार दामूभाई ठक्कर यांचा रविवारी कल्याणमध्ये सत्कार

कल्याण

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व वयाची १०० वर्षे पूर्ण केलेले कल्याणचे शतायुषी पत्रकार दामूभाई ठक्कर व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मुल्हेरकर यांचा सत्कार तथा गौरव सोहळा रविवारी कल्याणमध्ये होणार आहे.

रविवार, दिनांक १ मे रोजी सकाळी ११ वाजता पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हा सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या समारोहात ठाणे जिल्ह्यातील पत्रकारितेवरही परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक जनमतच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त हा समारोह होणार आहे. या समारोहास उपस्थित राहण्याचे आवाहन मुद्रक, प्रकाशक तेजस राजे यांनी केले आहे.